गोपाळकाला म्हणजे पांढर्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. `काला' हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणार्या क्रियेशी संबंधित आहे.
`काला' म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्या घटनांचे एकत्रीकरण. पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात.
'गोपाळकाला' हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो. काल्यातील प्रमुख घटक पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.
पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्या मातृभक्तीचे प्रतीक
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक
ताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीचे प्रतीक या दिवशी
ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.
ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.
इतर फायदे
शरीर व मन यांना पोषक : या दिवशी वायुमंडल आपतत्त्वाने भारीत असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते.
सर्व सृष्टीच आनंदी असणे
शरीर व मन यांना पोषक : या दिवशी वायुमंडल आपतत्त्वाने भारीत असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते.
सर्व सृष्टीच आनंदी असणे
वायुमंडलातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वृक्षचरही चैतन्ययुक्त लहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अत्यंत संवेदनशील बनल्याने सर्व सृष्टीच आनंदी असते.
एक दिवस कृष्णाने सकाळीच घाइघाईत सगळ्या त्याच्या सवंगड्यांना आवाज दिला अन् सर्वांना आपापल्या घरात जे काही शिळेपाळके आहे त्याच्या शिदोर्या घेऊन रानाकडे कूच करण्यास सांगितले. दुपारी गाईंना चरावयास सोडल्यावर सगळ्यांनी आपापल्या शिदोर्या सोडल्या. श्रीकृष्णाने त्या सगळ्या शिदोर्या एकत्र करून त्याचा काला केला. नंतर तो काला सर्वजण एकमेकांना प्रेमाने भरवू लागले. असा कृष्णाच्या हातचा अमुल्य प्रसाद आपल्यालाही मिळावा म्हणून देवादिक माशांच्या रूपाने येऊन यमुनेत उतरले. पण कृष्णाच्या सवंगड्यांची कृष्णावर जशी भक्ती होती, श्रध्दा होती. त्यामुळे त्यांना कृष्णाने दिलेला काला देवांना कसा मिळेल?
कृष्णासह त्याच्या सवंगड्यांनी काला खाल्ल्यावर कृष्णाने त्यांना हातही धुवू दिले नाहीत. त्या काल्याचा सुवास सगळयांनी त्यांच्या घरच्यांना दिला. त्यावर तुम्ही खूप भाग्यवान आहात. साक्षात भगवंताच्या हातचा प्रसाद तुम्हाला मिळाला. आम्ही मात्र त्याला मुकलो, असे म्हणून गोकूळवासी हळहळले.
त्या काल्याचा घास कृष्णाने मुखात घालता क्षणी सर्वांना अवीट रसाची गोडी चाखायला मिळाली. त्या काल्याच्या आठवणीसाठी आजही गोकुळाष्टमीनंतर गोपाळकाला केला जातो. त्यात दही, दूध, लोणचे, लाह्या, कुरमुरे, पोहे पापड इतकेच नव्हे तर त्यात भाकरीही कुसकरून घालतात. खरंच तो काला खाल्ल्यावर एक वेगळीच अविस्मरणीय चव जिभेवर रेंगाळते.
तुका म्हणे काला ! कोठे अभेद देखिला

No comments:
Post a Comment