August 29, 2016

*किकस्टार्ट लाईफ*

मंदिराच्या घंटांच्या आवाजात दिवसाला सुरवात झाली. लोकांची गडबड आणि दिनचर्या सुरू झाली तोच एका खोपट्यात राहणाऱ्या घरी "ती" लक्ष्मी तीचं नाव, साधी ठिगळ लावलेली साडी आणी चिंब केस बघून नुकतंच आंघोळ करून आल्याचं अबोल सांगत होती. 
गरीबी नशीबात आली तिच्या.  नवरा आजारपणात गेल्यापासून घर दार सांभाळायची सर्व जवाबदारी तीने घेतली.  नवरा गेला पण पोटूशी एक मुलगी होती.  दोघी एकमेकांना आधार होता. शरीराने अपंग असलेल्या मुलीचा आणि स्वत:चा उदरनिर्वाह कसाबसा व्हायचा.  दिवसभर फूलांच्या माळा विकून जेमतेम पैसा हाती लागायचा. सर्व व्यवस्थित सुरू असतानां एके दिवशी.

ताई ये ताई हाक मारली कुणीतरी...
ती : आले आले
फुलवाला होता :- काय गं ताई आज आली नाहीस दुकानावर माळा घ्यायला, म्हणून मीच आलो तुझ्याकडे. 
ती :- हो अरे निघालेच होते आता, ये ना आत य़े. चहा टाकते. 
तो - नाही नको गं दुकानावर कोण नाही. 
ती - (कपाळाला आलेला घाम पदराने पुसत,) घे रे..  लगेच होईलं. 
तो - (खुर्चिवर बसत) काय गं ताई बरं वाटत नाही वाटतं तुला. 
ती - हो..  जरा ताप वाटतोय, (बोलत चहाचा कप त्याच्या हातात देते.)
तो काहीच नं बोलता चहाचा एक घोट घेतो , ताई चहा मस्त झालायं.··(चिंतेने) 
ही दिसत नाहीय कुठे..? 
ती - आहे ना ती काय तिकडे बसलीय, मागे.  हिला कितीदा सांगीतलं की गल्लीतल्या पोरांमधे जाउ नकोस.  ती मुलं भाऊ काहीही बोलतात माझ्या छकू ला.  मग हीला वाईट वाटला कि येते तोंड मुरगडात पाणावलेल्या डोळ्यांनी.  द्या ईकडं द्या कप 
तो - चल ताई येतो मी.. 
येवढं बोलून तो तिथून निघतो.

ती - ये छकू, झालं असेल तर हा चहा पिऊन घे मि बाजारात जातीय. 
छकू - हा गं आले.  किती बडबड करतेस गं (
रांगत रांगत चहाच्या कपाजवळ येते)
आई अगं चपातीला तेल लावून दे ना चहा बरोबर खायला. 
ती- नाही आता मला ऊशीर होतोय अशीच खा चपाती. 
छकू -बरं
(ती फुलांच्या माळा आणि फुलं घेऊन अनवाणीच पायाने तरातरा बाजाराकडं निघाली. 
छकू तिच्या पाठमोऱ्या चेहऱ्याकडे दरवाज्याच्या दिशेने बघत चहा पिते.

छकू चहा पिऊन कप आवरून परत गल्लीतल्या मागच्या आवारात मुलं खेळतात तिथं येऊन बसती. आणि त्याना खेळताना बघून स्वत:शीच खुश होते जणु त्यांना खेळताना बघून हिच्या पायात जिव यायचा.

तिकडे ती बाजाराला पोचती. 
आपल्या नेहमीच्या जागेवर 
दुकान लावायला सुरवात करते. 
टोपला खाली ठेऊन पोतं अंथरते
आणी फुलं माळी सजवून शांत ग्राहकाची डोक्याला हात लावून वाट बघत असती.

तीचं आजचं वागणं काहीसं चिंताजनक आणी रागीट वाटत होतं
तोचं एक बाई फुलं घ्यायला येते,  
ऒह कशे दिलीत फुलं माळी ? 
ती- ३०₹ एक
बाई - ३०₹ बापरे, ३०ला दे दोन माळी पाहीजेल. 
ती -नाही हो परवडत नाही फुलं महाग झालीत
बाई - द्यायचेत तर दे(खेकसून. )
ती- (चिडून ) नाही विकायची तुम्हाला माळी.

हा सर्व कारभार शेजारीच बसलेली आजी सुरवातीपासून बघत होती. 
आजी - काय गं पोरी काय झालं
आले तेव्हापासून बघतीय , अवघडल्यासारखे वागतीयस. 
कुठे काय अडलंय तुझं..! (मंद हसते)

ती शांत " हम्म "

आजी अग बोल पोरी

ती - ( रडमोऱ्या चेहऱ्याने ) पाटलाचा पोरगा भेटलेला वाटेत, माझा हात पकडुन माझी वाट रोखली त्याने( आणी हुंदका देत दाबून ठेवलेल्या अश्रूंची वाट मोकळी केली)

आजी - अगं बाई ..!  असचं आहे गड्या ..  एकटी बाई बघीतली कि तोंडाला पाणी सुटलेल्या नजरेनं बघतात मेले.  त्याच्या करणीने कूत्र्याची मौत मरेल भाड्या..!

ये तो गुलाब दे , आवाज आला
कितीला आहे .? (कठोर आवाज कानी आला)

नजर वर केली तर पाटलाचा मुलगा...

आजी - ऒ साहेब कशाला छळता बिचारीला. 

ये म्हातारे तु गप बैस हा नाहीतरी तुझे दिवसं संपत आलेत. तु तो फुल दे गं

ती:- ( थरारलेल्या हातांनी ) त्याच्या हातात फुल देते.

तो फुल पकडण्याच्या हेतूने तिच्या बोटांना जाणून स्पर्ष करतो.  तापलय लई अंग तुझं चलं वाड्यावर वैद्य ला दाखवू...(त्याचं बोलणं पूर्ण होत नाही तोच्) चपाट §§§.... 
ती - बाजारात फूलं विकती मी अब्रू नाही.  तुमच्या सारख्या चारित्र्य हिन माणसांच्या देखण्या स्वभावातलं काळ मन चांगलीच जाणून आहे. परत का असं केलात तर शिवाजी महाराजांनी जो हाल रांझे गावच्या पाटलाचा केलेला तो हाल करेन. एकटी आहे पण दुबळी नाही. 
लक्षात ठेवा ही "लक्ष्मी" ,  सहन करत नाही..
(तुझा मुडदा बसवला )
बाजारात शुकशुकाट.

लगा लावली वाटतं पाटलाच्या पोराच्या कानाखाली.. (आजू बाजूची दुकानवाली)

ती तडतड दुकान आवरते आणी घराच्या वाटेने निघते.

घाबरलेला चेहरा थरथरलेले पाऊल तापलेली ऊन्हं त्यात तापलेलं शरीर घेऊन ती निघाली. 
पाटलाचा पोरगा हे सारं संतापलेल्या डोक्यानं बघत होता .  खिशातून मोबाईल काढत कानाला लावला.. हेलो§§....(कोणालातरी फोन लावला, फोन वर लक्ष्मी चं नाव घेतलं पण नक्की काय बोलला हे कोणीचं ऐकलं नाही.. 

संध्याकाळ व्हायला आली. 
छकू आई येईल म्हणून घरात काहीतरी विणत बसली.
६ वाजले, छकू घराजवळं असलेल्या एका लहान मुलाला, माझी आई बाजारातून निघाली काय सांग रे मला( निवांत स्वरात)..!! आणि परत तिच विणकाम केलं..! 
साडेसहाला ,  छकू आजी बोलली की त्या कधीच निघाल्यात खूप वेळ झाला त्याना निघून.

आता मात्र छकू घाबरली, तिला चिंता व्हायला लागली.

७ वाजले
८ वाजले
८ चे साडे आठ झाले
आई कुठेय 
अजून कशी नाही आली..! 
ईतका ऊशीर कसा झाला...! 
तिला काहीच कळत नव्हतं
काय करावं कुठे जाव कसं जावं कोणाला सांगावं ती पुर्ती घाबरली.

रांगत रांगत शक्य होईल तिथे तिने शोध घेण्याचा प्रयत्न केला.. 
काहीच ऊपयोग झाला नाही. 
ती कुठे गेली काहीच पत्ता लागला नाही. 
छकू रडली खूप खूप रडली... पोलिसात तक्रार नोंदवली..

दोन महीन्यांनी... 
(फुलमाळा वाला)
छकू अग छकू या घे फुलं माळा...!!
आज ऊशीर करू नकोस लवकर जा बाजारात.. 

विचार :- 
आयुष्य हे कुणाच्या असण्याने किंवा कुणाच्या नसण्याने कधीही थांबत नसतं... प्रत्येक माणूस सावरतो, बदलतो एका लाईफ मधील क्षणाने ने..!!
याचंच नाव ,  लाईफ किकस्टार्ट...!!

शब्द रचना - अभिलाष नारनवरे
8308120075

No comments:

Post a Comment

Ads Inside Post