अंधारलेली रात्र, सर्वत्र काळोख, भयान शांतता.
अशाच रात्रि मी थोडा कंटाळा आला म्हणून चाहा प्यायला बाहेर पडलो.
रात्रिचा १ वाजला होता.
"पूणे स्टेशन वरच आता चाहा मिळणार", माझ्या सोबत असलेला मित्र बोलला.
मग आम्ही पूणे स्टेशन कडे निघालो.
सर्वत्र शांतता नांदत होती पण स्टेशन च्या आवारात अजूनही गर्दी आणि कल्लोळ होता. आम्ही चाहा घेतला आणि मधेच माझ लक्ष स्टेशन बाहेरील घोळक्या वर गेलं. मनात कुतूहल जागलं आणि पाऊल त्या दिशेने सरसावले. नक्की काय सूरू आहे तिथे, कशासाठी येवढी गर्दी असे प्रश्न मनात जलद गतिने जन्मले. मी तिथे पोहोचलो तर एक साधारण ५५ वर्ष वयाचा माणूस तेथिलच एका रिक्षा चालकाची हुबेहूब प्रतिमा रेखाटत होता.
त्याचे कपड़े पाहून समजत होतं की हा मनूष्य स्टेशन वरच राहत असावा. वयस्कर माणूस होता चेहर्यावर सूरकूत्या आणि वाढलेली दाढ़ी, मळलेले कपडे त्याचा रिकामा असलेल्या खिशाची ग्वाही देत होते. पण चेहर्यावर गरीबीचा भाव दिसत नव्हता. चित्रकलेने तो माझ्या हूनही श्रीमंत भासत होता.
असे कित्येक कलाकार या गोजीरवाण्या जगात जन्मतात. परीस्थीतीवर मात करून त्यांची कला जोपासतात.
पण काय किंमत आहे त्या कलेला स्टेशन वरील चित्रकाराला अजून कोणीच ओळखत नाही, तो चित्र रेखाटत असताना त्याच्या कलेकडे सर्वांचेच लक्ष जायचे पण अंगावरील वस्त्र पाहून कोणीच तेथे थांबून त्याच्या कलेला वाव देत नव्हता.
खूप वेळ मि त्याची कलाकारी बघत होतो ऊशीर होत होता म्हणून घरी जायला निघालो.
पण मनात एका प्रश्नाने काहूर माजवलेला की, आजही लोक अंगी असलेल्या अनमोल कलेपेक्षाही जास्त अंगावर असलेल्या कपड्यात जास्त रूची ठेवतात.
Story By -अभिलाष नारनवरे.©

No comments:
Post a Comment